वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेतील विख्यात उद्योगपती इलॉन मस्क यांच्या आई माये यांनाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक वाटते असे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांची भेट मस्क यांनी आपल्या तीन अपत्यांसह घेतली होती. त्यावेळी माये यांनी या भेटीचे व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट केले होते. आपला पुत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट आहे, याचा अभिमान वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधी माझ्याही मनात मोठी उत्सुकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपला विदेश दौर आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भारतात परतले आहेत.









