चॅटजीपीटी आणि गुगलचा बार्ड यांच्यासोबत राहणार स्पर्धा
नवी दिल्ली :
अब्जाधीश एलॉन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्लॅटफॉर्म ‘ट्रुथजीपीटी’ लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. याद्वारे मस्क ओपनएआयच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या बार्डशी स्पर्धा करणार असल्याची माहिती आहे. मस्क यांनी एका मुलाखतीत या संदर्भात खुलासा केला आहे.
मस्क यांनी ओपनएआयवर खोटे बोलत असल्याचा किंवा एआयला प्रशिक्षण दिल्याचा आरोप करत टीका केली असून ते म्हणाले की ओपनएआय आता फक्त नफ्यासाठी ‘क्लोज्ड सोर्स’ प्लॅटफॉर्म बनले असल्याचेही म्हटले आहे.
एका मुलाखतीत एलॉन मस्क म्हणाले, मी असे काहीतरी लॉन्च करणार आहे ज्याला मी ट्रुथजीपीटी, द मॅक्झिमम ट्रुथ सर्चिंग एआय असे म्हणत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
धातू कंपन्यांचे समभाग तेजीत
मुंबई : शेअरबाजारात बुधवारी धातू कंपन्यांचा सहभाग असलेला निर्देशांक तेजी राखताना दिसला आहे. जिंदाल व टाटा स्टील यांचे समभाग तेजीत होते. एनएसईवर धातू कंपन्यांचा निर्देशांक 1 टक्का वाढला होता. जिंदाल स्टील, टाटा स्टील यांचे समभाग 4 टक्के इतके वाढले होते. जिंदालचे भाव या महिन्यात 8 टक्के इतके वाढले आहेत. यासोबत सेल, नॅशनल अॅल्युमिनीयम कंपनी आणि वेदांता यांचे समभागही तेजीत होते.









