वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
टेस्ला आणि स्टारलिंकचे सीईओ एलॉन मस्क यांनी युक्रेनचे इंटरनेट बंद करण्याची धमकी दिली आहे. युक्रेनमधील स्टारलिंक इंटरनेट प्रणाली बंद केली तर युक्रेनची संरक्षण यंत्रणा कोलमडेल असा इशारा मस्क यांनी दिला आहे. मस्क यांची स्टारलिंक इंटरनेट प्रणाली युक्रेनला लष्करी संपर्क राखण्यासाठी उपयुक्त ठरली आहे. स्टारलिंक सिस्टम ही युक्रेनियन सैन्याचा कणा असल्याचा दावा मस्क यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केला आहे. तथापि, नंतर त्यांनी दुसऱ्या एका ‘एक्स’ पोस्टमध्ये ‘मी युक्रेनच्या धोरणाच्या कितीही विरोधात असलो तरी, मी तिथे स्टारलिंकचे टर्मिनल कधीही बंद करणार नाही. मी स्टारलिंक इंटरनेटचा सौदा म्हणून वापर करणार नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.









