प्रतिनिधी /पणजी
पणजीतील मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे 8 जुलै रोजी पद्मश्री स्व. बा. ब. बोरकर (बाकीबाब) यांच्या पुण्यतिथीनिमित्त संध्याकाळी 4.00 वाजता संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनिल सामंत यांच्यासह स्व. बा.ब.बोरकर (बाकीबाबा) यांच्या कन्या आर. मुक्ता आगशीकर आणि भारती हेबळे उपस्थित राहतील.
दुसऱया सत्रात मनसा क्रिएशन, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.बा.ब. बोरकर यांच्या कवितांवर आधारित ‘स्वर अनुराग’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. विष्णू शिरोडकर (की बोर्ड, संगीत व्यवस्था), धनराज मडकईकर (हार्मोनियम), बिंदिया वस्त (गायन), गौतमी हेदे बांबोळकर (गायन), राजेश मडगांवकर (गायन) हे संगीतमय कार्यक्रमात सादरीकरण करतील.









