सावंतवाडी प्रतिनिधी
प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी महाराज) यांनी स्थापन केलेल्या पादुकांचा १३६ वा वर्धापनदिन शनिवार दि.४ जानेवारी २०२५(पौष शु.पंचमी) रोजी आहे.त्या निमित्त सावंतवाडी येथील श्री दत्तमंदिर,भटवाडी,येथे रात्री ठिक ८.oo वा.संगीतसेवा कार्यक्रम आयोजित केला आहे. रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध गायिका सौ.विनया विराज परब व नामवंत गायक श्री.हेमंत काशिनाथ देशमुख यांची अभंग,नाट्यगीत,भक्तीगीत इ.विविध रुपातील गायन मैफिल सजणार आहे.त्यांना संवादिनीसाथ श्री.नीलेश मेस्त्री,तबलासाथ श्री.किशोर सावंत आणि निवेदन श्री.संजय कात्रे करणार आहेत.तरी सर्व भक्तमंडळी व संगीतरसिकांनी या सुरेल कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.









