भाजपचे खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर चाललेल्या ईडीच्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी कोल्हापूरला भेट दिली आहे. आज त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगेंच्य़ा सह पत्रकार परिषद घेउन आमदार मुश्रीफ यांची जिल्हा बॅंकेतून हाकालपट्टी करावी अशी मागणी केली.
कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “केडीसीसी बँक मजबूत स्थितीत राहणार असून ठेवीदारांची रक्कम सुरक्षित राहणार आहे. एका व्यक्तीने घोटाळा केला आणि त्याची चौकशी लागली तर ती बँकेची चौकशी होत नाही. ही चौकशी त्या व्यक्ती संबंधित आहे. जर बँकेकडून काही चूका झाल्या तर त्या आरबीआयकडून दुरुस्त केल्या जातील.” असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बलताना त्यांनी “हसन मुश्रीफ यांच्या परिवार आणि कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. सध्या वेगवेगळ्या दिशेने तपास जात आहे. बँकेची नव्हे तर मुश्रीफ यांच्या आणि त्याच्या कुटुंबाशी आणि मित्रपरिवारशी संबधीत आर्थिक व्यवहाराची ही चौकशी सुरु आहे. असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला. हसन मुश्रीफ यांना आव्हान करताना शेतकऱ्यांना पुढे करून जर दंगा केला जात असेल तर चौकशी थांबत नाही. बँकेने कर्जदारांची टॉप 25 नावे जाहीर करावीत.” असे ते म्हणाले. या संबंधित ऑडिटरचीसुद्धा चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टिका करताना ते म्हणाले, “कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरुन हसन मुश्रीफ याची ताबडतोब हकालपट्टी करावी. हसन मुश्रीफ यांनी अध्यक्ष असताना आपल्या कंपन्यांना दिलेले कर्ज लॉंग टर्म केले. त्यामुळे त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे.” असा आरोप त्यांनी केला. तसेच यासंबंधितच्या चौकशीची मागणी सहकार मंत्री अतुल सावेंना निवेदनच्या माध्यमातून देणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








