आठ मृत वारकऱ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 50 हजारांची मदत
प्रतिनिधी/कोल्हापूर
पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबियाना आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनने दिलासा दिला. फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी या आठही कुटुंबांना भेटी देऊन प्रत्येकी 50 हजार रूपये मदतीचे धनादेश दिले.
आठवड्य़ापूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी ही मदत जाहीर केली होती. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेश लाटकर, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई, प्रदीप पाटील, सरपंच नंदकुमार खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम कासार, वसंतराव घोडके आदी प्रमुख उपस्थित होते.
करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील सहा व वळीवडे येथील दोन अशा आठ वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. काही वारकरी जखमी झाले. यावेळी मृतांचे कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्य़ा संख्येने उपस्थित होते. जुनोनी येथे अपघातात मृत्यू झालेल्या जठारवाडी, ता. करवीर येथील दिवंगत शारदा घोडके, सर्जेराव जाधव, सुनीता काटे, शांताबाई जाधव, रंजना जाधव, सरीता शियेकर या सहा जणांचा मृत्यू झाला होता. वळीवडे येथील सुशीला पोवार व गौरव पोवार या मायलेकरांचा मृत्यू झाला होता. या सर्व वारकऱयांचे कुटुंबिय व नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.
संकटग्रस्तांचे देवदूत
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे म्हणाले, आमदार हसन साहेब मुश्रीफ हे गोरगरिबांचे आधारवड आहेत. संकटग्रस्तांचे तर्फे देवदूतच आहेत. संकटात असलेल्यांच्या मदतीला धावून जाणे हाच त्यांचा खरा धर्म आहे.