वृत्तसंस्था/ ढाका
मार्च महिन्यात इंग्लंडचा क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात उभय संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळवल्या जाणार आहेत. बांगला देश निवड समितीने वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली असून पहिल्या दोन सामन्यांसाठी तमिम इक्बालकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. बांगलादेश संघामध्ये इक्बालचे पुनरागमन झाले आहे. भारताविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याला गेल्या डिसेंबर महिन्यात दुखापत झाली होती.
बांगलादेश संघ- तमिम इक्बाल (कर्णधार), लिटॉन दास, नजमूल हुसेन शांतो, शकीब अल हसन, मुशफिकर रहीम, अफिफ हुसेन, मेहमूद उल्ला, मेहदी हसन मिराज, मुस्ताफिजूर रेहमान, टी. अहमद, हसन मेहमूद, इबादोत हुसेन, टी. इस्लाम, तोविद रिदोय.









