व्रेडाई-यश इव्हेंटतर्फे 22 पासून आयोजन : प्रदर्शनासाठी 220 स्टॉलची उभारणी
बेळगाव : व्रेडाई बेळगाव व यश इव्हेंट आयोजित बेल्कॉन व ऑटो एक्स्पोचे मंटप पूजन इव्हेंट चेअरमन आनंद अकनोजी व सायली अकनोजी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी सीपीएड मैदानावर विधिवत करण्यात आले. व्रेडाई बेल्कॉन व ऑटो एक्स्पो दि. 22 ते 25 फेब्रुवारीदरम्यान 4 दिवस आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 220 स्टॉलची मांडणी करण्यात आली आहे. व्रेडाई बेल्कॉनचे इव्हेंट चेअरमन आनंद अकनोजी म्हणाले की, व्रेडाई व यश इव्हेंट्सच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे सर्वात मोठे प्रदर्शन भरविले जात आहे. गृहनिर्माण, रिअल इस्टेट, इंटिरिअर्स ऑफर करणारे 180 हून अधिक स्टॉल, बांधकाम साहित्य, फर्निचर आणि नवीनतम डिझाईन, टिकाऊपणा आणि तंत्रज्ञान, विद्युत उपकरणांचे प्रदर्शन आयोजित आले आहे. बांधकाम जागरुकता कार्यक्रम, स्पर्धा आणि मनोरंजन कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल सोल्युशन्स, डिझाईन, टिकावू आणि तंत्रज्ञानातील अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्सचे अनावरण आणि श्रेणी पाहण्यास मिळणार असून ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या उत्क्रांतीचे प्रदर्शन करून इलेक्ट्रीक वाहनांपासून ते लक्झरी कारपर्यंत अत्याधुनिक ऑटोमोबाईल्सच्या प्रदर्शनात स्वत:ला मग्न करा. प्रदर्शनातील लक्झरी वाहने आणि स्पोर्ट्स बाईक हे या एक्स्पोचे मुख्य आकर्षण आहे आणि बाईक स्टंट शो आयोजित केला जाणार आहे. यावेळी व्रेडाई बेळगावचे अध्यक्ष दीपक गोजगेकर, इव्हेंट चेअरमन आनंद अकनोजी, राजेंद्र मुतकेकर, प्रशांत वांडकर, विजय पाटील, युवराज हुलजी, सीमा हुलजी, गोपाळराव कुकडोळकर, राजेश हेडा, पी. एस. हिरेमठ, सचिन बैलवाड, राजेश माळी, विठ्ठल हुबळी, कऊणा हिरेमठ, अनुश्री बैलूर, गीता वांडकर, अपर्णा गोजगेकर, यश इव्हेंटचे अजिंक्मय कालकुंद्रीकर, प्रकाश कालकुंद्रीकर, विनय कदम, अभिषेक मुतकेकर, प्रवीण खर्डे, जयराज माळी, कृष्णा बैलूर, नगरसेवक अभिजित जवळकर, सागर कल्लेहोळकर, ऋषभ हिरेमठ, राहुल बांडगी, अनंत पाटील, रोहिणी पाटील, आनंद तुडवेकर आदी उपस्थित होते.









