दहा जणांच्या टोळक्याने केले तलवारीने सपासप वार
रत्नागिरी प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे कबड्डी स्पर्धेतून झालेल्या तत्कालीन वादाच्या रागातून साखरपा गावातील सागर वैद्य या (22 वर्षे) तरुणावर सुमारे 10 जणांनी तलवारीने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागर वैद्य याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या हल्ल्यानंतर साखरपा येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी साखरपा दुरुक्षेत्राला घेराव घालत जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या घटनेमुळे साखरपा गावात तणाव निर्माण झाला असून रात्री पोलिसांची अतिरिक्त कुमक रत्नागिरीतून साखरपा गावाकडे रवाना झाली होती. तर उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे हे रात्री घटनास्थळी दाखल झाले होते.
गेले तीन दिवस साखरपा येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीचा सामना सुरू होता. त्या ठिकाणी एक तरुण उभा होता. त्या पाठीमागे प्रेक्षक असल्याने त्याला बाजूला होण्याची सूचना तेथील काहींनी केली होती. यातूनच वादाला सुरुवात झाली. परंतु त्यानंतर हा वाद चर्चेद्वारे मिटवण्यात आला