बसरीकट्टी येथील युवकाचा खून केल्यानंतर मृतदेह विहिरीत टाकून दिल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली.
मारुती उर्फ पवन परशराम खन्नुकर (वय 32) असे मृताचे नाव आहे . याबाबत समजलेली माहिती अशी की पवन हा सोमवार रात्री जेवण करून घराबाहेर पडला होता त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यानंतर त्याची शोधा शोध केली असता गावाजवळील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. पवन यांच्या डोक्यात दगड घालून आधी खून करण्यात आला त्यानंतर विहिरीत मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत .खुनाचे कारण मात्र समजू शकले नाही.









