सिंदगी तालुक्यातील पडगांनुर येथील घटना
वार्ताहर/जमखंडी
पत्नीचा खून करून पती फरार झाल्याची घटना जमखंडीतील चौडयानगर परिसरात शुक्रवारी रात्री घडली. कावेरीचा विवाह काही वर्षांपूर्वी पुनीत गिरणी, रा. पडगांनुर, ता. सिंदगी, जि. विजापूर याच्याबरोबर झाला होता. त्यांना दोन मुली असून अलीकडे कावेरी येथील चौडय्या नगरमध्ये आपल्या माहेरी राहण्यास आली होती व आपल्या मुलींना येथील शाळेत दाखल केले होते. तिचा पती पुनीत बालाप्पा गिरणी (वय 28) येथे आला असता त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला व पुनीतने काठीने मारहाण करून कावेरी (वय 25) हिचा खून करून फरार झाला असल्याचे कळते. घटनास्थळाला जमखंडी डीवायएसपी शांतवीर ई, सीपीआय मल्लाप्पा मड्डी, पीएसआय अनिल कुंभार यांनी भेट देऊन अधिक तपास सुरू केला आहे.









