दोघांना अटक : मृत चिंचवाडचा : एसटी जप्त
कोल्हापूर प्रतिनिधी
चिंचवाड (ता. शिरोळ) येथील संदीप रामगोंडा शिरगावे या तरूणाचा त्याच्या सासू-सासऱ्याने धावत्या बसमध्ये गळा आवळून कागलनजीक खून केला. खुनानंतर त्याचा मृतदेह कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर फेकून देऊन संशयित सासू, सासऱ्याने पोबारा केल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मृत संदीप याच्या खिशातील एसटी बसचे तिकीट व फोन नंबरच्या आधारे खुनाच्या गुह्याचा उलगडा केला. याप्रकरणी सासू गौरा हनमंतआप्पा काळे (वय 45), सासरा हनमंतआप्पा यल्लाप्पा काळे (वय 49, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) या दोघांना अटक केली.
संदीप शिरगांवे याचा भडगांव येथील हनमंतआप्पा काळे याच्या मुलीशी दहा वर्षापूर्वी विवाह झाला आहे. या दाम्पत्याला एक लहान मुलगा आहे. संदीप ट्रकवर चालक म्हणून काम करीत होता. तो दाऊ पिऊन पत्नी कऊणाला सतत त्रास देत होता. याची माहिती कऊणाने आपल्या आई, वडिलांना सांगितली होती. त्यावऊन संदीपला सासू-सासऱ्याने अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या वर्तणुकीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे त्याची पत्नी कऊणाने त्याच्यापासून घटस्फोट घेऊन ती लहान मुलासह गडहिंग्लज येथे गेल्या दोन वर्षापासून राहत आहे. तरीही तो अधूनमधून तिच्या घरी दाऊ पिऊन येऊन त्रास देत होता. बुधवारी पुन्हा त्याने तिला त्रास दिला. याची माहिती तिने आई-वडिलांना सांगितली. त्याला गावाकडे पाठविण्यासाठी बुधवारी सायंकाळी गडहिंग्लज बसस्थानकात त्याला सासू, सासरे घेऊन आले. त्याला तिकीट काढून देऊन गडहिंग्लज-कोल्हापूर एसटी बसमध्ये बसविले. हे दोघे पती-पत्नी मुलीच्या दोघे घरी आले. याचदरम्यान संदीप वाटेतच बसमधून उतऊन परत गडहिंग्लज बसस्थानक परिसरात आला. याचवेळी त्याचे सासू-सासरे गावाकडे जाण्यासाठी म्हणून गडहिंग्लज बसस्थानकामध्ये आले. यावेळी त्यांना जावई संदीप दिसून आला. त्यामुळे सासू-सासऱ्याने त्याचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन केला. त्यानुसार सासू-सासऱ्याने त्याला तुला गावाकडे सोडून येतो चल असे सांगून त्याला विनावाहक गडहिंग्लज-कोल्हापूर बसमध्ये बसवले. ही एसटी बस त्यांच्यासह पाच प्रवाशांना घेऊन कोल्हापूरकडे रवाना झाली. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एसटी बस कागलनजीक आल्यानंतर संदीपच्या सासू-सासऱ्याने बसमधील प्रवाशांचा अंदाज घेत नाडीने धावत्या एसटी बसमध्ये गळा आवळून खून केला. एसटी कोल्हापूर स्थानकात आल्यानंतर बसचालकाने परतीच्या प्रवासासाठी बस उभी कऊन कंट्रोल ऊमकडे गेला. सासू-सासऱ्याने दोन प्रवासी उतऊन गेल्यानंतर संदीपचा मृतदेह एसटी बसमधून ओढत आणून एका दुकानाच्या पायरीवर फेकून दिला.
त्यानंतर हे दोघे संशयित पती-पत्नी रात्रीच्या एसटी बसने गडहिंग्लजला आले. गुऊवारी सकाळी बसस्थानक स्वच्छता करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना एक तऊण निपचित पडलेला दिसून आला. त्यांनी याची माहिती एसटीच्या कंट्रोल निरीक्षकाला दिली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यावऊन शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिदकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निपचित पडलेल्या तऊणाची तपासणी केली. यावेळी त्यांना त्याच्या गळ्यावर दोरीचा वण आणि नखे ओरबडल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा कऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरकडे पाठवून दिला. शवविच्छेदनामध्ये त्याचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले.
त्यावऊन शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुऊ केला. याचदरम्यान पोलिसांना सीबीएस बसस्थानकामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करताना एक पुऊष आणि एक महिला त्या तऊणाला फेकून देऊन जात असलेले फुटेज हाती लागले. फुटेज, त्याच्या खिशातील एसटी बसचे तिकीट आणि फोन नंबरवऊन संबंधित फोनवर संपर्क साधला. त्यावेळी तो फोन गडहिंग्लज येथील महिलेने उचलून तिने आपले नाव सांगितले. पोलिसांनी त्वरित तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या महिला आणि पुऊषाचे फुटेज दाखविले. तिने आपले आई-वडील असल्याचे सांगितले. त्यावऊन तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुऊ केली. चौकशीदरम्यान या दाम्पत्याने मद्यपी संदीपचा खून केल्याची कबुली दिली. त्यावऊन या दोघांना गुऊवारी रात्री उशिरा अटक केली. याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
खुनाच्या गुह्याच्या एसटी बस जप्त
संशयित गौरा काळे आणि तिचा पती हनमंतआप्पा काळे या दोघांनी मद्यपी जावई संदीप शिरगांवे याचा धावत्या एसटी बसमध्ये गळा आवळून खून केला. या खुनात दोघांनी एसटी बसचा वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्याने, शाहूपुरी पोलिसांनी एसटी बस ताब्यात घेऊन जप्त केली. खुनासारख्या गंभीर गुह्यात एसटी बस जप्त होण्याची ही पहिलीच घटना होय.