पुणे / वार्ताहर :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणमधील वरिष्ठ टेक्निशियन अधिकाऱ्याचा भरदिवसा निर्घृण खून करण्यात आला. सिंहगड रोड परिसरातील रायकर मळा येथे ही घटना घडली.
गोपाळ कैलास मंडवे (वय 32) असे खून झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास गोपाळ मंडवे हे रायकर मळा परिसरातील मनोहर गार्डनजवळ, खंडोबा मंदिर रोड परिसरातून जात होते. त्यावेळी अज्ञात आरोपीने त्यांच्या मानेवर आणि छातीवर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा निर्घृण खून केला. सिंहगड रोड पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. याबाबतचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.








