Sindhudurg Crime News : ओवळीये येथील माजी उपसरपंच लवु सावंत यांचा खून प्रकरणात त्यांचा सख्खा भाऊ अजित सावंत याला पोलिसांनी अटक केली आहे.आज त्याला सावंतवाडीतील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सावंतवाडी न्यायालयासमोर सरकारी वकील वेदिका राऊळ यांनी युक्तिवाद केला. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सख्ख्या भावाकडून भावाचा खून करण्यात आल्याची ही जवळपास चौथी घटना आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतमांगरात माजी उपसरपंच लवु सावंत हे रात्री झोपण्यासाठी गेले होते. गाढ झोपेत असतानाच सकाळी सात ते नऊच्या दरम्यान त्यांचा सख्खा भाऊ अजित सावंत याने त्याचा खून केल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. श्वान पथक तपासणीत संशयित आरोपी अजित सावंत यांच्या आजूबाजूलाच श्वान घुटमळत होता. श्वानाने अजितवर चारदा झडप घातली त्यामुळे संशय अजून बळावला. त्यावरून पोलिसांनी अजित सावंत याला काल सायंकाळी ताब्यात घेतले होते. रात्री त्याला अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले. या खूनात अजून कोणी सामील आहे का याचा शोध पोलीस करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









