गुडीकट्टी-बैलहोंगल येथील घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
क्षुल्लक कारणावरून दगडाने ठेचून एकाचा खून करण्यात आला आहे. गुडीकट्टी (ता. बैलहोंगल) येथे गुरुवारी ही घटना घडली असून दोडवाड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी त्याच गावातील एका रहिवाशाला ताब्यात घेतले आहे. बसवराज रामण्णा कुंभार (वय 46) असे खून झालेल्या दुर्दैवी इसमाचे नाव आहे. तो मूळचा कटगेरी (ता. गुळेदगुड्ड, जि. बागलकोट) येथील राहणारा होता. मजुरीसाठी तो गुडीकट्टीत आला होता. गावातील बसवराज कल्लय्या पुजेर यांच्या बांधकामावर बसवराज पुंभार काम करीत होता.
किराणा सामान आणण्यावरून झालेल्या वादावादीनंतर बसवराज पुजेरने दोरीने गळा आवळून व दगडाने ठेचून त्याचा खून केला आहे. दोडवाड पोलीस पुढील तपास करीत आहेत.









