प्रतिनिधी/ बेळगाव
कळ्ळीगुद्दी (ता. मुडलगी) येथील एका महिलेचा खून करण्यात आला आहे. विळ्याने वार करून दोन दिवसांपूर्वी तिचा खून झाला असून कुलगोड पोलिसांनी शनिवारी संशयिताला अटक केली आहे.
लक्कव्वा यमनाप्पा तोळीन (वय 30) मूळची रा. तुक्कानट्टी, सध्या रा. कळ्ळीगुद्दी असे त्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी विठ्ठल कऱ्याप्पा बिलकुंदी (वय 23) याने विळ्याने वार करून लक्कव्वाचा खून केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कुलगोड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले. शेतजमिनीत पिकाला पाणी पाजताना लक्कव्वावर विळ्याने हल्ला करून तिचा खून करण्यात आला आहे.









