वृत्तसंस्था / भोपाळ (मध्यप्रदेश)
मध्यप्रदेशात सध्या खुषबू अहिरवार नामक मॉडेलचे संशयास्पद मृत्यू प्रकरण गाजत आहे. या प्रकरणी तिचा सहकारी कासीम याला अटक करण्यात आली आहे. या मॉडेलचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्यानंतर कासीम याने तिला रुग्णालयात दाखल केले. नंतर त्वरित तो बेपत्ता झाला. मॉडेलच्या मातापित्यांनी या मृत्यूसाठी कासीम यालाच जबाबदार धरले असून हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे, असा पोलिसांचा संशय आहे. कासीम याची कसून चौकशी केली जात आहे. कासीम याने तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या मातापित्यांनी टेवला आहे.
मॉडेलच्या शवविश्छेदनाच्या अहवालाची पोलीस प्रतीक्षा करीत आहेत. हा अहवाल हाती आल्यानंतर तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. त्यानंतर कासीम याच्यावर पुढील कारवाई केली जाईल. कासीम याने खुषबू अहिरवार हिची फसवणून केली आहे. त्याने ‘राहुल’ हे हिंदू’ नाव धारण करुन तो तिच्या संपर्कात आला आणि नंतर तिचा सहकारी म्हणून राहू लागला, असे तिच्या मातापित्यांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी एफआयआर सादर करुन घेतला असून त्याच्या आधारावर कासीम याला अटक करण्यात आली. हे प्रकरण गंभीर असून त्याची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती भोपाळ पोलिसांनी सोमवारी दिली.









