ओटवणे :सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथील माजी उपसरपंच लवू रामा सावंत (५५) यांचा डोक्यात दगड घालून खुन करण्यात आला. त्यामुळे दानोली परिसरात खळबळ उडाली आहे. मयत सावंत हे नजीकच्या पाचा येथील आपल्या शेतात असणाऱ्या मांगरात रविवारी रात्री झोपले होते. सोमवारी सकाळी त्यांचा भाऊ शेतात गेला असता त्याने आपल्या भावाला मृतावस्थेत पाहिले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे व पोलीस हवालदार दत्ता देसाई करत आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









