ओटवणे येथील घटना ; जमिनीच्या पैशाच्या वादातून खून
प्रतिनिधी – ओरोस
जमीन विक्रीतील पैसे न दिल्याच्या रागातून सख्ख्या काकाचा खून केल्याप्रकरणी शैलेश वसंत नाईक [45 ,रा ओटवणे करमळगाळूवाडी ) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस .जे भारुका यांनी दोषी धरले आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकर यांनी काम पाहिले. दरम्यान आरोपीने पैशावरून आपल्या सख्ख्या काकाच्या डोक्यात फावडे मारून १७ ऑक्टोबर २०२१ रोजी खून केला होता.ओटवणे येथील आपल्या वाटणीच्या हिश्श्यातील पाच गुंठे जमीन काका -प्रभाकर लक्ष्मण नाईक यांनी विक्री केली होती. यातील काही रक्कम आपल्याला द्यावी अशी मागणी पुतण्या शैलेश याने केली होती. परंतु काकांनी ही रक्कम परत न केल्याच्या रागातून पुतण्या शैलेश नाईक यांनी रागाच्या भरात आपल्या काकांचा खून केला होता .सिंधुदुर्गनगरी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात चाललेल्या या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाने सादर केलेले साक्षी पुरावे याच्या आधारे शैलेश याला न्यायालयाने खून प्रकरणात दोषी ठरवले आहे.









