वार्ताहर /नंदगड
खानापूर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांचा युवा समिती बेळगाव व शिवसेना बेळगाव यांच्यावतीने खानापूर समिती कार्यालयात त्यांना शुभेच्छा देऊन शाल व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. य् ाावेळी म. ए. समिती युवा नेते शुभम शेळके, युवा कार्यकर्ते नारायण मुचंडीकर, प्रवीण रेडेकर, शिवसेना बेळगाव संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, शिवसेनेचे दिलीप बैलूरकर, प्रवीण तेजम, महेश टंकसाळी तसेच जिल्हा युवा सेनेतर्फे विनायक हुलजी, वैभव कामत, अद्वैत चव्हाण-पाटील, भरत पाटील यांनीही मुरलीधर पाटील यांचा सत्कार केला. मुरलीधर पाटील विजयी होणार असून खानापूर तालुक्यातील मतदारांनी त्यांना आपले मत देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.









