वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुनिश बाली यांची न्यूझीलंड दौऱयावर जाणाऱया भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दौऱयासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली असून बाली यांचा या सपोर्ट स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे.
राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफला या दौऱयासाठी ब्रेक देण्यात आला असून लक्ष्मण हे मुख्य प्रशिक्षक आहेत. 18 नोव्हेंबरपासून वेलिंग्टनमधील सामन्याने या दौऱयाची सुरुवात होईल. या दौऱयात 3 टी-20 व 3 वनडे सामने खेळविले जातील. बाली, ऋषिकेश कानिटकर (फलंदाजी प्रशिक्षक), साईराज बहुतुले (गोलंदाजी प्रशिक्षक) हे सपोर्ट स्टाफमधील अन्य सदस्य आहेत. हे सर्व प्रशिक्षक राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कार्यरत आहेत. बाली यांनी आयर्लंड व इंग्लंड दौऱयात व त्यानंतर मायदेशात द.आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही काम पाहिले आहे.









