शिरोळ नगर परिषद कर्मचारी सहभागी होणार- अध्यक्ष संदीप चुडमंगे
शिरोळ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात रविवार दिनांक १ मे २०२२पासून बेमुदत संप पुकारण्यात आला असून या संपात शिरोळ नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती शिरोळ नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप चूडमुंगे यांनी दिली आहे.
शासन दरबारी नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद आणि नगरपंचायत संवर्ग अधिकारी-कर्मचारी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मुंबई येथे कर्मचारी संघटनेचा मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार दिनांक १ मे २०२२ रोजी ध्वजारोहण करून सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपात शिरोळ नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत, असे संदीप चूडमुंगे यांनी सांगितले आहे यावेळी सचिन सावंत, विनोद बिराणे, विनायक लोंढे, ज्ञानेश्वर कंदले, प्रभावती बाबर, मलिकार्जुन बल्लारी, पोपट आदके, रायफल कांबळे, रुपेश कांबळे, सुमन कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते