प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेच्या कर, अर्थ स्थायी समितीची बैठक सोमवार दि. 6 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत 26 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविण्यासह त्याला मंजुरी देणे, महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या मालमत्तांची मालकी सुधारणे, महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या मैदानांच्या भाड्यात सुधारणा करणे, यासह अध्यक्षांच्या परवानगीने इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सर्व सदस्यांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी यांनी कळविले आहे.
बांधकाम स्थायी समितीची मंगळवारी बैठक
महानगरपालिकेच्या बांधकाम स्थायी समितीची बैठक मंगळवार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे बैठकीला सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी यांनी कळविले आहे. मागील 18 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्त वाचून दाखवून मंजुरी देणे, मनपाच्या मालकीच्या सामुदायिक भवनांमध्ये लोकांसाठी वैयक्तिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भाडेतत्त्वावर आकारण्यात येणाऱ्या देखभाल शुल्कात सुधारणा करणे, प्रभाग क्रमांक 34 शाहूनगर मुख्य रस्त्यावर पथदीपांचे खांब बसविणे, खासबाग बसवेश्वर सर्कल येथे हायमास्ट बसविणे, गोवावेस जलतरण तलाव ते दुसरे रेल्वेगेटपर्यंतच्या पथदीपांचे नुकसान व केबल बदलण्याबाबत, इंद्रप्रस्थनगर क्रॉसवरील विद्युत खांब बसविणे, शहापूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनी, हरिजनवाडा येथील विद्युत खांब बसविणे, हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तातडीने करण्यात आलेल्या कामांचे बिल अदा करण्याबाबत, यरमाळ तलावाचे पुनरुज्जीवन, तिसरे रेल्वेगेट ओव्हरब्रिजला वीजपुरवठा करण्याबाबत, हुतात्मा चौक, प्रभाग क्र. 4 येथे सिमेंट काँक्रिटचे पेव्हर्स बसविणे, गणपत गल्ली येथील सार्वजनिक वाचनालय ते कंबळी खूटपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती, प्रभाग क्र. 4 मधील चित्रा टॉकीज रोड दुरुस्ती व अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे.









