प्रतिनिधी/ बेळगाव
महापौर-उपमहापौर निवडीनंतर आता पुन्हा स्थायी समितीच्या बैठकी घेण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला आहे. सोमवार दि. 19 रोजी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
नूतन महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर ही पहिलीच स्थायी समितीची बैठक होत आहे. सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष वाणी जोशी यांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला असून शहरातील पथदीप, तसेच इतर समस्यांवर बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. मागील बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती. त्या ठरावांना देखील या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे.









