वेतन मिळतोपर्यंत काम करणार नसल्याचा इशारा
बेळगाव : शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या मनपातील वाहन चालकांना वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे कामबंद करून बुधवारी सकाळी सदाशिवनगर येथील गोडावूनसमोर आंदोलन सुरू केले. जोपर्यंत वेतन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, असा आग्रह धरला. मनपातील कचरा वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा सहा तर काही चालकांचे नऊ महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर मनपासमोरही ठिय्या आंदोलन केले होते. तरी देखील वेतन देण्यात आले नाही. केवळ आश्वासने देण्यात आली. त्यामुळे पुन्हा बुधवारी हे आंदोलन केले.यामुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांची समजूत घातली. मात्र, वाहन चालक बधले नाहीत. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मनपा वाहन चालकांनी कामाला सुरुवात केली.









