सांगली :
मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या १०० दिवस गतिमान प्रशासन अभियान अंतर्गत क्यू आर कोड ही नवी सुविधा सुरू करण्यात आली असून या क्यूआर कोडचा वापर करून नागरिकांना मनपाच्या सेवेबद्दल अभिप्राय व मते नोंदवता येतील. त्यावर मनपाच्या वतीने योग्य ती कार्यवाही व उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली.
नागरिक आणि कर्मचारी, अधिकारी यांच्या समनव्यातुन गतिमान प्रशासन करण्यासाठी नवा उपक्रम राबविण्यात येत आहे, नागरिकांनी प्रतिसाद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आता नागरीकांनी क्यूआर कोड स्कॅन करुन विभाग प्रमुखांबाबत किंवा विभागाबाबत थेट आयुक्तांकडे अभिप्राय पाठविता येणार आहे. आयुक्त, गुप्ता यांनी क्यू आर कोड बाबतची माहिती त्यांच्या दालनाच्या बाहेर लावून सर्व विभागातही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. अति आयुक्त, उप आयुक्त, सहा आयुक्तसह सर्व विभागात सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महापालिकेने नागरिकांनी विभागास भेट दिल्यानंतर तेथील अनुभव, कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती बाबत तसेच अधिकारी, कर्मचारी यांची वागणूक या बाबत नागरिकांनी अभिप्राय देणे सोयीचे होण्यासाठी विशिष्ठ क्यूआर कोड प्रशासनाने तयार केला आहे. सदर क्यूआर सर्व विभागाचे दर्शनी भागावर लावलेला आहे. नागरीकांनी कार्यालयांना भेट दिल्यानंतर तेथील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती, नागरीकांशी वर्तवणूक किंवा कामकाजाची पद्धत इ. बाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी क्यू आर कोडचा वापर करावा व त्यावर अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन गुसा यांनी केले आहे. अभिप्रायाची नोंद थेट आयुक्क् यांचे दप्तरी होणार आहे. त्यानुसार त्या विभागांचे मुल्यमापन केले जाणार आहे…. मुख्यमंत्री यांच्या १०० दिवस गतिमान प्रशासन अभियान अंतर्गत सदरची सुविधा नागरीकांसाठी करण्यात आलेली आहे, अशी माहिती सहा आयुक्त नकुल जकाते यांनी दिली आहे.








