कोल्हापूर :
शहरवासीयांवर कोणत्याही नव्या कराचा बोजा न टाकता, सुशासन, ऑनलाईन सेवा, पाणी पुरवठा विभागात स्मार्ट मिटर योजना, रस्ते, देखभाल, पंचगंगा प्रदूषण आणि कचरा मुक्त कोल्हापूरची हमी देणारा महापालिकेचा तब्बल हजार कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी (दि. 24) सादर केला जाणार आहे. प्रशासकांमार्फत सादर केला जाणारा हा सलगपणे पाचवा अर्थसंकल्प आहे.
महापालिकेत प्रशासनराज येवून पाच वर्ष पूर्ण झाली. सभागृह नसताना सलगपणे प्रशासकांनी सादर केलेला पाचवा अर्थसंकल्प हाही एकप्रकारे विक्रम आहे. मागील पाच वर्षात प्रशासक राजमध्ये शहवासीयांवर कोणताही नवा कर लादायचा नाही, असा कटाक्ष यंदाही पाळला जाणार आहे. महापालिकेचं स्वउत्पन्न चारशे कोटी रुपये इतकेच आहे. नाविन्यपूर्ण योजना, स्वच्छ भारत अभियानातील निधी, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना, प्रस्तावित योजना आणि विकास निधी असा तब्बल हजार कोटी रुपयांचा अर्थ संकल्प यंदाच्या वर्षीही असणार आहे.
पाणी पुरवठा, घरफाळा आदी सर्वसामान्यांशी संबंधित कराची वाढ होणार नसल्याचे संकेत आहेत. मात्र, नगररचना विभाग, परवाना विभाग आदी विभागासह इस्टेट विभागाकडील काही बाबींत दरवाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट सर्वसामन्यांशी संबंध असणार नाही. इ ऑफिस सक्षम करुन ऑनलाईन सेवांवर भर देणे, तक्रार निवारण कक्ष सक्षम करणे, विविध प्रकारच्या महापालिकेच्या सेवा मोबाईल ?पच्या माध्यमातून देणे, शहरातील कचरा उठाव आणि त्याचे शास्त्राrय पध्दतीने निराकरण, पूर व्यवस्थापण,पावसाळी पाणी व्यवस्थापण, उड्डा पुलांचे प्रस्ताव, पाणी गळती तसेच पाणी पट्टी नियमित वसुली होण्यासाठी ई मिटर प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे.
- कागदावरचे हजार कोटींचे बजेट
2023-24 : 1 हजार 261 कोटी 48 लाख 33 हजार 169 रु.
2022-23 : 988 कोटी 31 लाख 27 हजार 178 रु.
2021-22 : 988 कोटी 31 लाख 35 हजार 268 रु.
2020-21 : 1 हजार 246 कोटी 31 लाख 3 हजार 115 रु.
2018-19 : 1 हजार 168 कोटी 11 लाख 18 हजार 364 रु.
2019-20 : 824 कोटी 92 लाख 55 हजार 500 रु.
2017-18 : 1 हजार 47 कोटी 75 लाख 35 हजार 260 रु.
2016-17 : 1 हजार 158 कोटी 46 लाख 19 हजार 556 रु.








