सांगली महापालिकेने फुथपाथवरील अतिक्रमण उचलले
सांगली : माधवनगर रोडवर फुथपाथवरील अतिक्रमणावर महापालिकेने जेसीबी चालवला आहे. सर्किट हाऊस कॉर्नरवरील वळणावर फुथपाथ वरील पेव्डन ब्लॉक महापालिकेने हटविले. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने नगर अभियंता महेश मदने यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
सांगली कॉलेज कॉर्नरकडून सर्किट हाऊसकडे वळण घेताना आजूबाजूच्या व्यवसायिकांनी रस्त्यावरच पेव्हिन ब्लॉकचे अतिक्रमण केले होते. यामुळे वळणावर पाणी साचून रस्ता खराब होतं होता. या पेव्हिन ब्लॉकमुळे रस्त्यावरील पाणी चेंबरला जाण्याचा मार्ग बंद झाला होता.
त्यामुळे आज आयुक्त सत्यम गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार नगर अभियंता महेश मदने यांच्या पथकाने जेसीबी लावून पेन्डिन ब्लॉकचे अतिक्रमन उचकटून रस्ता मोकळा केला. आता याठिकाणी पाईप टाकून रस्त्यावर साचणारे पाणी थेट चेंबरमध्ये सोडले जाणार आहे. या कारवाईमुळे व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहेत.








