तीन स्थायी समित्यांवर महिला तर एका समितीवर पुरुष उमेदवार अध्यक्षपदी
बेळगाव : महापालिकेच्या चारही स्थायी समिती अध्यक्षपदांची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली. यावेळी तीन नगरसेविकांना तर एका नगरसेवकाला अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. अर्थ व कर स्थायी समिती अध्यक्षपदी रेखा मोहन हुगार, आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपदी लक्ष्मी महादेव राठोड, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपदी माधवी सारंग राघोचे, लेखा स्थायी समिती अध्यक्षपदी ब्रह्मानंद मिरजकर (नंदू) अर्जुन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
12 ऑगस्ट रोजी प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य सभागृहात चार स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. त्यानंतर महापौर मंगेश पवार यांनी स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवडणूक घेण्यासंदर्भात कौन्सिल विभागाला पत्र दिले होते. त्यानुसार कौन्सिल विभागाने चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदांची निवड करण्यासाठी सोमवार दि. 18 रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया केली. मात्र, चारही स्थायी समिती अध्यक्षपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने वरील सर्वांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली, मनपा आयुक्त शुभा बी. यांच्यासह सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवक उपस्थित होते.
►अर्थ व कर स्थायी समिती
अध्यक्ष- रेखा मोहन हुगार, सदस्य-जयंत जाधव, सारिका पाटील, संतोष पेडणेकर, अजिम पटवेगार, अफरोज मुल्ला.
►आरोग्य स्थायी समिती
अध्यक्ष- लक्ष्मी महादेव राठोड, सदस्य-नितीन नामदेव जाधव, रुपा चिक्कलदिन्नी, प्रीती विनायक कामकर, मोदीनसाब मतवाले, वैशाली भातकांडे, अभिजित जवळकर.
►बांधकाम स्थायी समिती
अध्यक्ष- माधवी सारंग राघोचे, सदस्य-राजू भातकांडे, संदीप अशोक जिरग्याळ, श्रेयस नाकाडी, दीपाली संतोष टोपगी, ज्योती कडोलकर, शाहीदखान पठाण.
►लेखा स्थायी समिती
अध्यक्ष- ब्रह्मानंद मिरजकर (नंदू) अर्जुन, सदस्य-रविराज सांबरेकर, नेत्रावती विनोद भागवत, वीणा श्रीशैल विजापुरे, शिवाजी मंडोळकर, अस्मिता पाटील, रवी धोत्रे.









