प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेकडून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सध्या गतीने सुरू आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून श्रीनगर येथील महानगरपालिकेच्या गोशाळेमध्ये पाठविण्यात येत आहे. शुक्रवारी नरगुंदकर भावे चौक, सुभाषनगर व गणेशपूर या भागामधील मोकाट जनावरे पकडून ती गोशाळेत पाठविण्यात आली.
शहरातील बाजारपेठेत 8, पाटील गल्ली येथे 1, नरगुंदकर भावे चौक येथे 2, सुभाषनगर रोड येथे 2, एस. पी. ऑफिस रोड येथे 2 तर गणेशपूर रोड विनायकनगर येथे 2 जनावरे पकडण्यात आली. एकूण 34 जनावरे श्रीनगर येथील गोशाळेमध्ये देण्यात आली आहेत. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहीम तीव्रपणे राबविली आहे.









