बेळगाव : आज पहाटे बेळगाव महानगर पालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी घरोघरी जाऊन कचरा उचलणाऱ्या गाड्यातून शहराची भ्रमंती केली.
या आधी त्यांनी सदाशिवनगर येथील मनपा विभागीय कार्यालयात सायकलच्या मार्फत जाऊन वाहन चालकांची हजरी तपासली. बायोमेट्रिकचा वापर करण्यास तसेच पहाटे साडेपाचला कर्तव्य बजावण्यासाठी हजर राहण्यास सांगितले. अनगोळ परिसरात भ्रमंती करून कचऱ्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.