तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना सूचना : स्वतंत्र व्यापार परवाना घेणे आवश्यक
प्रतिनिधी/ बेळगाव
तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी स्वतंत्र व्यापार परवाना घेण्याची सूचना महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांना भेट देऊन परवाना घेण्याबाबत सूचना करत आहेत. त्याचबरोबर तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानीकारक असून त्यामुळे पॅन्सर होतो, असा संदेश देणारे फलक दुकान आवारात लावण्याची सूचनाही केली आहे.
महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या व्यापार परवान्याबाबत अधिकारी व कर्मचारी अॅक्शन मोडवर आले आहेत. ज्या व्यापाऱ्यांकडे मनपाचा व्यापार परवाना नाही आणि ज्यांनी परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही त्यांना कारवाईचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे नूतन परवाना घेण्यासह नूतनीकरणासाठी महापालिकेत व्यापाऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. या माध्यमातून बेळगाव महापालिकेला लाखो ऊपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यातच राज्य सरकारच्या सूचनेनुसार जे व्यापारी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करतात, त्यांनी स्वतंत्र व्यापार परवाना घेणे जऊरीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तातडीने 15 फेब्रुवारीपर्यंत व्यापार परवान्यासाठी महापालिकेकडे अर्ज करावेत. अन्यथा 16 फेब्रुवारीपासून परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गुटखा आणि सिगारेटमुळे पॅन्सर होतो, असे संदेश देणारे फलकही दुकानात लावणे जऊरीचे आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्वत: महापालिका आयुक्तांनी शहरातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांची भेट घेऊन विविध सूचना केल्या.









