25 किलो फटाके जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र, यावर्षी प्रदूषण होऊ नये यासाठी हिरव्या फटाक्यांना मान्यता दिली आहे. मात्र काही व्यावसायिक पूर्वीच्या लाल फटाके विक्री करत होते. याची माहिती महानगरपालिकेला समजली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकानावर धाड टाकून फटाके जप्त केले आहेत.
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. संजू नांद्रे यांच्यासह आरोग्य निरीक्षकांनी ही कारवाई केली. एकूण 25 किलो फटाके जप्त करण्यात आले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. यापुढेही अशा प्रकारची कारवाई फटाके विक्री करणाऱ्यांवर केली जाणार आहे.









