ऑनलाईन टीम/तरुण भारत
नवाब मलिक (nawab malik) यांना आत मुंबई उच्च न्यायालयानेही (high court) राज्यसभेच्या निवडणुकीवेळी (rajyasabha election) मतदान करण्यासाठी जामीन नाकारला आहे. नवाब मलिक लवकरच नवी याचिका दाखल करणार असून, त्यात मतदानासाठी परवानगी मिळावी ही मागणी करणार आहेत. पण सुधारीत याचिकेवर सुनावणीसाठीच हायकोर्टानं नकार दिल्यामुळे मलिकांच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही धुळीला मिळाल्या आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावं, यासाठी नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मतदानासाठी आपल्याला एक दिवसाचा जामीन मिळावा, अशी मागणी नवाब मलिकांनी याचिकेत केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयानं ती फेटाळून लावली आहे. त्यानंतर याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी करत मलिकांनी पुन्हा नव्यानं याचिका केली होती. दुपारच्या सत्रात या याचिकेवर सुनावणी पार पडणार होती. पण सुधारीत याचिकेवर सुनावणीसाठीच हायकोर्टानं नकार दिल्यामुळे मलिकांच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही धुळीला मिळाल्या आहेत.
गुरुवारी 9 रोजी पीएमएलए कोर्टात नवाब मलिकांनीही मतदान करण्यासाठी जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयानं आपला निकाल दिला होता. त्यांनतर मालिकांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु कैदी या नात्यानं जामीन देऊ शकत नाही हे न्यायालयानं स्पष्ट सांगितलं आहे.