ओटवणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या मुंबई झोन सहसचिवपदी सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आनंद रासम यांचीएकमताने निवड करण्यात आली.
केमिस्ट असोसिएशनच्या मुंबई झोनसाठी सन २०२३-२६ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी ही निवडणूक ठाणे येथे शनिवारी घेण्यात आली. मुंबई झोन मध्ये मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे येथे घेण्यात आलेल्या या निवडणुकीत केमिस्ट असोसिएशच्या मुंबई झोनच्या सहसचिवपदासाठी आनंद रसम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशच्या मुंबई झोनचे माजी उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल पाटकर, जिल्हा असोसिएशनचे सचिव संजय सावंत, खजिनदार विवेक आपटे, कणकवली तालुका अध्यक्ष संजय घाडीगावकर आदी उपस्थित होते.









