सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने सत्कार
ओटवणे प्रतिनिधी
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशच्या मुंबई झोन सहसचिवपदी सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आनंद रासम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड परीमल नाईक यांच्याहस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा सचिव संजय सावंत, माजी अध्यक्ष दयानंद उबाळे, सहसचिव प्रसाद तेरसे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष विनायक दळवी, आनंद ठाकूर, प्रवीण नाईक उपस्थित होते.यावेळी अँड परिमल नाईक यांनी केमिस्ट बांधवांच्या एकजुटीचे कौतुक करीत कोरोना काळात केमिस्ट बांधवांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला. तसेच केमिस्ट असोसिएशन पदाधिकारी व केमिस्ट बांधवांच्या पाठबळावर आनंद रासम यांच्या सक्षम नेतृत्वाचे कौतुक करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आनंद रासम यानी जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांच्या एकजूटीमुळेच आपली मुंबईतून सहसचिव पदावर बिनविरोध निवड झाली असून असोसिएशनचे सर्व पदाधिकारी केमिस्ट बांधवांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव संतोष राणे, माजी अध्यक्ष मकरंद कशाळीकर, श्रीराम गावडे, अमर गावडे, सचिन मुळीक, स्टिव्हन डिसिल्वा, कालिदास बर्वे, संतोष पाताडे, संदीप राऊळ, प्रदीप नार्वेकर, ग्रेगरी डांटस, श्रीकृष्ण सप्ते, सुधीर शिरसाट, उमेश कालकुंद्रीकर, सचिन बागवे, तात्या डूबळे, प्रशांत पेडणेकर, सतिश पडते, महेश पास्ते, प्रसाद गुरव, आशिष सावंत, अशोक परब, ज्ञानदीप राऊळ, पराग सावंत, श्री गोवेकर, संयोगिता कालकुंद्रीकर, प्रज्ञा मनसे, ओंकार खानोलकर, सुनिल सावंत, विठ्ठल व्हनमाने, सादिक शेख, सिमरन राऊळ, आनंद जाधव, आदी उपस्थित होते.









