Mumbai: सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा मुंबईवर हल्ल्याचं सावट आहे. मुंबई पोलिस ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचे मेसेज आले आहेत २६/११ सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा करणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. कंट्रोल रुमच्या नंबरवर पाकिस्तानमधून हे धमकी वजा मेसेजेस आले आहेत. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र त्या आधीच आता मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे. या नव्याने होणाऱ्या हल्ल्यामध्ये भारतातलेच ६ लोक मदत करणार आहेत, असंही या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. आत्ताच दहीहंडीची धामधूम थंडावली आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आहे. त्या पाठोपाठ लगेचच नवरात्रौत्सव, दिवाळी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याच्या धमकीने खळबळ माजली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








