ऑनलाईन टीम तरुण भारत
निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. याबरोबरच दोन्ही गटाला शिवसेना (Shivsena) नावही वापरता येणार नसल्याचं म्हटले आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांना महत्वाची सूचना दिलीय.
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून आरोप प्रत्यारोप केले जात असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊन नका असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. तर पक्षातील प्रवक्त्यांना सुद्धा याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालावर सकाळपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया येत असतांना, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र यावर न बोलण्याची भूमिका घेतली आहे. कारण मनसेच्या कोणत्याही प्रवक्त्याने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने यावर प्रतिक्रिया देऊ नयेत अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी खुद्द मुख्य प्रवक्त्यांना फोन करून याबाबत सूचना केल्या आहेत. तर व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रत्येकाला कळवण्यात आले आहे की, या सर्व प्रकरणावर कोणतेही प्रतिक्रिया देऊ नयेत.