Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.यानंतर हा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.
अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना काही दिवसापूर्वी धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्राचा संबंध गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी असल्याचे आढळले होते. सलमान खानला मिळालेले पत्र हे हिंदी भाषेत होते. या पत्राच्या शेवटी लिहिलेल्या जी.बी.आणि एल.बी.या आद्याक्षरांचा अर्थ गुंड गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई असा काढला होता.
अधिक वाचण्यासाठी- पुणे-बेंगलोर महामार्गवर उचगाव जवळ ट्रकचा अपघात, एकजण ठार तर तिघेजण गंभीर
लॉरेन्स बिश्नोईने २०११ च्या ‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानवर हल्ल्याची योजना आखली होती,परंतु तो अयशस्वी झाला.त्यानंतर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याच्याही हिटलिस्टवर सलमान असल्याचा खुलासा झाला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









