ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा निर्णय घेतला आहे. शहरात आता चालकासह कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला सीट बेल्ट (seat belt) लावणे बंधनकारक असणार आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईत आता दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेटनंतर चारचाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबईत आता दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीपाठोपाठ चार चाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर ज्यांच्या गाडीत सीटबेल्टची सोय नाही त्यांनी ती तातडीन करून घेण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट नसलेत तर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

मोटार वाहन कायदा 2019 च्या कलम 194(ब) (1) मध्ये असे नमूद केले आहे की चारचाकी मोटार वाहनाचा चालक आणि इतर प्रवाशांनी प्रवास करताना सीट बेल्ट न लावल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्यानुसार ज्या चारचाकी वाहनांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीटबेल्टची सुविधा नाही, त्यांना सीटबेल्टची आवश्यकता सुधारण्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात येत आहे. त्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर चारचाकी मोटार वाहनातून प्रवास करणाऱ्या चालक आणि इतर प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल अन्यथा मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 च्या कलम 194 (ब) (1) अंतर्गत कारवाई करण्यात येईल.








