Dasara Melava 2022 : मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे व ठाकरे गटात चढाओढ सुरु आहे. मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे. रितसर परवानगी मागूनही महापालिकेनं चालढकल केल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतली आहे. महापालिका प्रशासनावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्यासाठी महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
दु्र्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी शिंदे गट आग्रही
शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा ? यानंतर कल्याणमधील दु्र्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सव कोण साजरा करणार ? यावरुन शिंदे ठाकरे गटात वाद निर्माण झाला होता. दोन्ही गटाने दुर्गाडी देवी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली होती. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्याने कोणाला परवानगी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख व विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिली आहे.ठाकरे गटामध्ये यामुळे नाराजीचे वातावरण असून शहरप्रमुख सचिन बासरे यांनी आम्हाला परवानगी का नाकारण्यात आली याचे कारण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट करायला हवे. आम्ही याबाबत कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
Previous ArticleKolhapur : विद्यापीठातील विविध पदांसाठी 14 नोव्हेंबरला निवडणूक
Next Article Ratnagiri : दापोली नगर पंचायतीत दीड कोटींचा अपहार?








