Amit Shaha News : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून राजकीय घडामोडी घडत आहेत. आज मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आहे. अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार असल्याचे ट्विट करत सांगितलं. त्यानंतर ते माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच २०० पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आज मेघदूत बंगल्यावर महत्त्वाची बैठक होणार आहे. तसेच भाजपा कोअर कमिटीची बैठक देखील होणार आहे. यात भाजप, शिंदे गटाला अमित शहा कोणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबई महापालिकेसोबतच महाराष्ट्रात ११ मनपाच्या निवडणूका होणार आहेत. मुंबई महापालिकेसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. अमित शाह कालपासून दौऱ्यावर आहेत. गणेशोत्सवा निमित्त जरी हा दौरा असला तरी पुढच्या चार महिन्यात मुंबई महापालिकेचं बिगुल वाजणार आहे. या दौऱ्यात ते अनेकांच्या भेटी घेणार आहेत. बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. या बैठका आगामी निवडणूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
शाहांचा मुंबई दौरा का महत्त्वाचा
-पुढच्या चार महिन्यात मुंबई महापालिकेचं बिगुल वाजणार आहे.
-मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे.
-ठाकरे सरकार उलथून टाकल्यानंतर आता भाजपचं पालिकेवर लक्ष
-मुंबई पालिकेचं वर्षाचं बजेट ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
-गेली २५ वर्ष शिवसेनेची मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता.
-मुंबई पालिकेची सत्ता ही शिवसेना पक्षासाठी मोठी ताकद
-४० आमदार फुटल्यानंतर पालिकेची सत्ताही गेल्यास शिवसेनेची कोंडी होणार.
Previous Articleसंजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला
Next Article ढगफुटी सदृश्य पाऊस घरामध्ये भरले पाणी








