ऑनलाईन टीम/तरुण भारत
आमदार अब्दुल सत्तारांकडून (Abdul Sattar) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा नागरी सत्कार सोहळा ठेवला होता. यावेळी बोलताना अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं उधळली. आपली शिवसेना ओरिजिनल शिवसेना आहे. शिंदेच्या धनुष्यबाणासमोर कोणचाच बाण टीकणार नाही, अशा शब्दांत आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.
दरम्यान, मुंबईच्या रविंद्र नाट्यगृहात सत्तार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी स्तुतीसुमने वाहिली. रात्री दोन वाजता त्यांनी मतदारसंघासाठी निधी वाटप केला. गेल्या काही वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री, मत्र्यांनी जी मदत केली नाही, ती मदत एकनात शिंदे यांनी केली. आमच्या सिल्लोडसाठी सूत गिरणी पाहिजे होती, १९८० पासून ही आमची मागणी होती. पण ही मागणी ८० तासांत एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये ही भूमिक शिंदेंची आहे. जो माणूस न्याय देतो असा मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिला, असंही ते पुढे म्हणाले.








