वृत्तसंस्था/ मुंबई
19 वी मुंबई मॅरेथॉन 21 जानेवारीला होणार असून या मॅरेथॉनसाठी गुरुवारपासून इच्छुकांच्या नावांची नोंदणी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठेची मॅरेथॉन मध्यंतरी कोरोना समस्येमुळे दोन वर्षे घेण्यात आली नव्हती. त्यानंतर ती गेल्या वर्षी झाली आणि त्यामध्ये सुमारे 55 हजार स्पर्धकांनी विक्रमी सहभाग दर्शवला होता. या मॅरेथॉनसाठी हौशी गटातील इच्छुकांना 10 ऑगस्टपासून आपली नावे नोंदवता येतील. नावनोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर राहिल. हाफ मॅरेथॉनसाठी 12 ऑगस्टपासून नावनोंदणीला प्रारंभ होणार असून 25 सप्टेंबर ही शेवटची तारीख राहिल.









