वृत्तसंस्था / मुंबई
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या सामन्यात मुंबईने महाराष्ट्राला पहिल्या डावात 126 धावांत गुंडाळले. त्यानंतर मुंबईने दिवसअखेर पहिल्या डावात 3 बाद 220 धावा जमवित महाराष्ट्रावर 94 धावांची आघाडी मिळविली. मुंबईच्या डावात 17 वर्षीय आयुष म्हात्रेने नाबाद शतक (127) झळकविले.
या सामन्यात मुंबईच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राचा पहिला डाव कोलमडला. काझीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 5 चौकारांसह नाबाद 36 तर निखिल नाईकने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 38 धावा जमविल्या. अंकित बावनेने 4 चौकारांसह 17, अर्शिन कुलकर्णीने 2 चौकारांसह 14 आणि सिद्धेश वीरने 1 चौकारासह 11 धावा केल्या. मुंबईतर्फे अवस्थी आणि मुलानी यांनी प्रत्येकी 3 तर शारदुल ठाकुर आणि डायस यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
मुंबईच्या डावमध्ये म्हात्रेने 163 चेंडूत 3 षटकार आणि 17 चौकारांसह नाबाद 127 धावावर खेळत आहे. पृथ्वी शॉ आणि तेमोरे हे फलंदाज लवकर बाद झाले. अजिंक्य रहाणेने 64 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा जमविताना म्हात्रे समवेत तिसऱ्या गड्यासाठी 99 धावांची भागिदारी केली. रहाणे बाद झाल्याने श्रेयश अय्यर यांनी म्हात्रे यांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 97 धावांची भागिदारी केली. अय्यर 2 षटकार आणि 4 चौकारांसह 45 धावांवर खेळत आहे. महाराष्ट्रातर्फे प्रदीप दधेने 2 तर वळुंजने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: महाराष्ट्र प. डाव सर्व बाद 126, मुंबई प. डाव 3 बाद 220 (आयुष म्हात्रे खेळत आहे 127, श्रेयश अय्यर खेळत आहे 45, रहाणे 31)









