वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघाने आपल्या खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्या जर्सीचे अनावरण थाटात करण्यात आले.
मुंबई इंडियन संघातील खेळाडू 31 मार्चपासून सुरू होणाऱया आयपीएल क्रिकेट स्पर्धेत या नव्या जर्सीसह मैदानात उतरतील. शंतनू आणि निखिल या जोडीने या नव्या जर्सीचे डिझाईन केले आहे. या जर्सीचा रंग निळा आणि सोनेरी असा आहे.









