वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई इंडियन्सची गाठ आज गुरुवारी होणाऱ्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादशी पडणार असून यावेळी मुंबईला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतेल, अशी आशा असेल. सनरायझर्स हैदराबादच्या स्फोटक फलंदाजांना रोखण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी ते आवश्यक आहे. तीन महिने दुखापतीमुळे बाहेर राहावे लागल्यानंतर परतलेल्या बुमराहला अद्याप अचूकता सापडलेली नाही.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूविऊद्धच्या चांगल्या सामन्यानंतर बुमराहला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याचे यॉर्कर टाकताना संघर्ष करावा लागला आणि दिल्लीच्या कऊण नायरने त्याच्यावर आक्रमणही केले. त्या सामन्यात त्याने 44 धावा दिल्या. त्यामुळे या 31 वर्षीय खेळाडूला सनरायझर्सच्या ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांचा समावेश असलेल्या फळीविरुद्ध कठोर परीक्षेला सामोरे जावे लागेल. पाच वेळच्या विजेत्या मुंबईची माजी कर्णधार रोहित शर्माला लवकरात लवकर सूर मिळावा अशीही इच्छा असेल. कारण सध्या त्याने 5 सामन्यांतून 11.20 च्या सरासरीने केवळ 56 धावा केल्या आहेत.
केवळ दोन विजयांसह गुणतालिकेत मुंबई संघ सातव्या स्थानावर असून संघ सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या योगदानावर अवलंबून आहे. सूर्यकुमार अजूनही त्याच्या सर्वोत्तम सुरात आलेला नसला, तरी लखनौ सुपर जायंट्सविऊद्धच्या त्या कठीण सामन्यानंतर तिलकने 56 आणि 59 धावा करून आपण फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. नमन धीर हा मुंबईसाठी आणखी एक महत्त्वाचा खेळाडू आहे, कारण त्याला शेवटच्या षटकांतील आक्रमक फलंदाजाची भूमिका देण्यात आली आहे.
मुंबईने अचूक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर दिल्लीवर ज्या प्रकारे विजय मिळवला ती क्षमता त्यांना घातक ठरवू शकते. विशेष म्हणजे मुंबई व हैदराबाद या दोघांनीही त्यांच्या मागील सामन्यांमध्ये प्रभावी विजयांसह त्यांची निराशाजनक वाटचाल खंडित केलेली आहे. परंतु ते सातत्य राखू शकतील का हे पाहावे लागेल. सनरायझर्सनेही सहा सामन्यांमध्ये चार पराभव स्वीकारले असून दोन विजय नेंदविले आहेत. फक्त ‘नेट रन रेट’मुळे मुंबई हैदराबादपेक्षा वरच्या स्थानावर आहे. मुंबईचा नेट रन रेट 0.10, तर हैदराबादचा उणे 1.24 आहे. पण मुंबईला हैदराबादच्या फलंदाजांपासून सावध राहावे लागेल. कारण हैदराबादच्या फलंदाजांनी लय परत मिळाल्याचे संकेत दिले आहेत. हेड, अभिषेक, क्लासेन आणि किशन या चारही आघाडीच्या खेळाडूंनी पंजाब किंग्सला धक्का देत हैदराबादला या हंगामातील दुसरा विजय मिळवून दिला हे विसरून चालणार नाही.
संघ-मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, श्रीजीथ कृष्णन), बेव्हन जेकब्स, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, मिशेल सँटनर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथूर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चाहर, अश्वनी कुमार, रीस टोपले, व्ही. एस. पेनमेत्सा, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, स्मरण रविचंद्रन, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, विआन मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चाहर, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.









