ऑनलाईन टीम/तरुण भारत
अधिश बंगला (Adhish Bunglow) बेकायदेशीर बांधकामप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. न्यायालयाने राणे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. तसेच याप्रकरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तर राणे यांना याप्रकरणी सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जिल्हा समितीकडे जाण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेने अधिश बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनीही नोटीस पाठवली होती. सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली होती. यांनतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, याप्रकरणी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याप्रकरणी सागरी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जिल्हा समितीकडे जा, त्यांना प्रकरण ऐकू द्या, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.