मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही अपूर्णच
मुंबई :
बारा वर्षांहून अधिक काळ लोटला तरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कोकणवासीय चाकरमान्याचा गणेशोत्सवातला प्रवास अजूनही खडतरच आहे. तरीही वसुलीसाठी टोलनाके बसविलेले आहेत. त्यामुळे कोकणवासीय अधिकच नाराज आहेत. मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्यापही अपूर्ण असून, रस्त्याची दुरवस्था वाढत चालली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी मोठे ख•s पडले असून, नुकतेच बनवलेले काही रस्ते पुन्हा उखडू लागले आहेत. शासन आणि बांधकाम विभागाने रस्त्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत टोलनाक्यांच्या उभारणीला प्राधान्य दिले आहे. गणेशोत्सव आला की रस्त्याच्या कामासाठी आंदोलन करणाऱ्या संघटना जाग्या होतात. आंदोलनाचा इशारा देतात. मात्र गणेशोत्सव
संपला की या संघटनाही गप्प होतात. रायगड जिह्यातील सुकेळी खिंड आणि चांढवे या भागात टोलनाके पूर्णपणे बांधून तयार ठेवण्यात आले आहेत, मात्र रस्ता अजूनही ख•dयांनी भरलेला आहे. प्रवाशांना दररोज या खराब रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. इतक्या खराब अवस्थेमध्येही लवकरच टोलवसुली सुरू होणार असल्याची शक्यता आहे. पर्यायी सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता नागरिकांना मिळत नाही, तेव्हा टोल घेण्याचा शासनाला कोणताही नैतिक अधिकार नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.









